OLXने आला चोर घरी
तुम्हाला जर स्वतःची गाडी विकायची असेल आणि त्यासाठी तुम्ही OLX वर जाहिरात करणार असाल तर जरा सावधान. कारण अशा जाहिरातीच्या माध्यमातून एखादा चोर तुमच्याशी संपर्क साधू शकतो आणि नंतर टेस्ट राईडचा बनाव करून तुमची गाडी घेऊन पसार होऊ शकतो.
पुणे : तुम्हाला जर स्वतःची गाडी विकायची असेल आणि त्यासाठी तुम्ही OLX वर जाहिरात करणार असाल तर जरा सावधान. कारण अशा जाहिरातीच्या माध्यमातून एखादा चोर तुमच्याशी संपर्क साधू शकतो आणि नंतर टेस्ट राईडचा बनाव करून तुमची गाडी घेऊन पसार होऊ शकतो.
पुण्यात असा प्रकार उघडकीस आलाय. अशा पद्धतीनं गाड्या चोरणाऱ्या आदित्य देशमुख या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केलीय. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्याएत.