अंबरनाथ : बारसे कार्यक्रमात छातीत गोळी लागून एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला. अंबरनाथ गायकवाड पाडा या ठिकाणी काल रात्री सत्यजित गायकवाड यांच्या घरी बारसे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीजे वाजत असल्याने प्रतिक गायकवाड हा 13 वर्षांचा मुलगा रात्री ते बघण्यासाठी गेला होता. मात्र अचानक गोळीबार झाला. त्यात एक गोळी प्रतिकच्या छातीवर लागल्याने तो खाली कोसळला. उपचारादरम्यान प्रतिक गायकवाड याचा मृत्यू झाला.


दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अशोक गायकवाड, आशिष गायकवाड, सत्यजीत गायकवाड, कबीर गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी कबीर गायकवाड हा माजी नगरसेवक आहे.