अहमदनगर :  बातमी एका जिगरबाज तरुणाची... ज्यानं केले बिबट्याशी दोन हात... संगमनेर तालुक्यात आंबी-खालसा शिवारातल्या गणपीर दारामध्ये बिबट्यानं हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बिबट्याशी दीपक भानुदास बर्डे यांनी दोन हात केले. शेतात काम करताना त्यांना हालचाल जाणवली. त्यांनी तातडीनं बाजुलाच असलेल्या भाच्याला आणि मुलांना दूर केलं. त्याचवेळी बिबट्यानं हल्ला केला. 


तेव्हा दिपक यांनी बिबट्याशी दोन हात करत भाचा पंकज पवार आणि मुलांचे प्राण वाचवले. यात हल्ल्यात दिपक मात्र गंभीर जखमी झाले आहेत.  त्यांच्या पोटाला जखमा झाल्या आहेत.