नागपूर : उन्हाच्या तडाक्यापासून बचाव करण्यासाठी नागपूर पालिकेने हिट अॅक्शन प्लॅन बनवलाय. शहरातील उद्याने दिवसा सुरू ठेवण्याची निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्याचा ताबा अश्लिल चाळे करण्या-या तरूणी तरूणांनी घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोमँटिक पोझ दिलेले हे तरूण तरूणी बघितले की हिंदी चित्रपटातील शुटिंग सुरू आहे का असा प्रश्न पडेल. मात्र ही दृष्य आहेत नागपूरच्या अंबाझरी उद्यानातील. नागपूरच्या वाढत्या तापमानापासून दिलासा मिळावा यासाठी महानगरपालिकेने हिट अॅक्शन प्लॅन अंतर्गत उद्यानाची सोय केली. इतर वेळी बंद असलेली उद्यानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.


पा-याच्या कोपापासून दिलासा मिळावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात आता मात्र सामान्य नागपूरकरांपेक्षा अश्लील चाळे करणारे तरूण तरूणीचं दिसले. तर काही भागातील उद्यान बंद असल्याची तक्रार नागपूरकरांनी केलीय. 


नागपूर महानगरपालिकेने सर्व सामान्य नागपूरकरांच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा पोलीस अधिका-यांनी व्यक्त केलीय. नागपूर महानगरपालिकेचा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. मात्र तरूण वर्गाने इतरांना त्रास होऊ नये या सामाजिक जबाबदारीचे भान देखील तरुणाईने ठेवायलाच हवे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.