ठाणे : एका अल्‍पवयीन मुलीला कॉल करून तिच्‍याशी अश्‍लील बोलणाऱ्या एका तरुणाला चोप देण्यात आला आहे. महिलांनी ऐरोली परिसरातील निवस्‍त्र करून बाजारातून त्याची धिंड काढली. २१ वर्षाच्या सुशीलकुमार जयस्‍वालला तरूणींशी फोनवरून अश्लील बोलणे चांगलेच महागात पडले.


परिसरातील महिला होत्या त्रस्‍त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांचे नंबर मिळवून सुशील त्‍यांच्‍यासोबत फोनवर अश्‍लील बोलायचा. त्‍यामुळे या परिसरातील महिला त्रस्‍त झाल्‍या होत्‍या. पण, त्‍याची ओळख पटत नव्‍हती.
काही दिवसांपूर्वी त्‍याने एका मुलीला कॉल केला. मुलीच्या कुटुंबीयांना या बाबत 'मनसे' महिला कार्यकर्त्‍यांना सांगितले.


त्याला असं ताब्यात घेण्यात आलं


महिला कार्यकर्त्‍यांनी त्‍या मुलीला सांगितले की, सुशीलसोबत फोनवर बोलून त्‍याचे नाव आणि पत्‍ता विचारून घे आणि भेटायला बोलवं. सुशील त्‍या मुलीला भेटण्‍यासाठी शनिवारी रात्री ऐरोली परिसरात आला. मनसेच्‍या महिला कार्यकर्त्‍यांनी त्‍याला घेरले आणि बेदम मारहाण केली. यानंतर त्‍याला निवस्‍त्र करून त्‍याची धिंड काढली आणि त्‍याला पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले.