औरंगाबाद : औरंगाबाद प्राणीसंग्रहालयातील बिबट्यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर प्राणीसंग्रहालय संचालक नाईकवाडे यांना आयुक्तांनी निलंबीत केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोबतच बी.एम. नाईकवाडे यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आलेत. नाईकवाडे यांना मुख्यालय न सोडण्यासही सांगण्यात आलंय. 


हेमलकसा ते औरंगाबाद प्रवासात बिबट्यांना आणण्यात कसूर करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. आजारी रेणूवर आवश्यक उपचार न करता इतर उपचारावर वेळ घालवला. रेणूच्या गर्भधारणेबाबतही दिशाभूल करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.


चुकीचं औषध दिल्यानं वेळी आधीच रेणूची प्रसुती झाल्याचा ठपकाही नाईकवाडी यांच्यावर ठेवण्यात आलाय. याप्रकरणी अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तीन वर्षाची कारवाई होऊ शकते, असं वनविभागानं सांगितलंय.