ठाणे : मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न हा नेहमीच पोलिसांसाठी चिंतेची बाब राहिला आहे. गेल्या १४ महिन्यांत ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने देहविक्री करणाऱ्या ४३ बांगलादेशींना अटक केली आहे. 'लोकमत'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५ साली एकट्या ठाणे शहरात पोलिसांनी ३०-३५ ठिकाणी छापे टाकून १०० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. यातील अनेक व्यक्ती बांगलादेशी नागरिक असल्याचे आता पुढे आले आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये केलेल्या कारवाईत तीन बांगलादेशी नागरिक पकडले गेले आहेत. यात सर्व कारवाईत अनेक महिलांचाही समावेश आहे.


ठाणे शहरातील कापूरबावडी, कळवा, मुंब्रा, शीळ-डायघर, तर जिल्ह्यातील  डोंबिवली मानपाडा, नारपोली, भिवंडी आणि कोनगाव या परिसरात अनेक बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य आहे.