बिल्डरनं खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुरडा बेपत्ता
चेंबूर लाल डोंगर परिसरात बिल्डिंगचे काम सुरु असलेल्या एका खड्यात १४ वर्षीय मुलगा पडल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : चेंबूर लाल डोंगर परिसरात बिल्डिंगचे काम सुरु असलेल्या एका खड्यात १४ वर्षीय मुलगा पडल्याची माहिती मिळतेय.
विनय इजगत असं या मुलाचं नाव आहे. पाण्यानं भरलेल्या या खडड्यात मुलाचा शोध सुरू आहे. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते मुलाचा शोध घेत आहेत.
माहिती मिळाल्यानंतर चुनाभट्टी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली आणि त्यानंतर हालचालींना वेग आला. खूप खोल असलेल्या खड्ड्यातून पाणी काढण्याचं काम अग्निशमन दलानं सुरू केलंय.
चेंबूर परिसरात एकता हाऊसिंग सोसायटी या इमारतीचं काम सुरु आहे. भगवती बिल्डर असं या विकासकाच नाव आहे.
.