मुंबई : मुंबईतल्या बोरीबंदर ते ठाणे या देशातल्या पहिल्या रेल्वे सेवेनं १६४ वर्षं पूर्ण केली आहेत. १६ एप्रिल १८५३ याच दिवशी मुंबई ते ठाणे ही देशातली पहिली रेल्वे धावली होती. ही रेल्वे आणि हा रेल्वे प्रवास आशिया खंडातला पहिला रेल्वे प्रवास ठरला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साहेबांची पोर लय भारी बिना बैलघोड्याची हाकलली गाडी ,अशा घोषणा देत, १६ एप्रिल १८५३ साली या गाडीचं जंगी स्वागत केलं गेलं होतं. 


या निमित्तानं ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेनं केप कापून हा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला. यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातल्या फलाट क्रमांक दोनवर रेल्वेचा खास प्रतिकात्मक ५ किलोचा केक तयार करण्यात आला होता. 


मुंबईकरांची लाईफलाईन असलेली रेल्वे, दरदिवशी लाखो प्रवाशांची वाहतूक करते. दरम्यान अधिक सुविधा मिळण्याची गरज यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान रेल्वे प्रवासामध्ये सतर्कतेमुळे हजारो लोकांचे प्राण वाचवलेले मोटरमन, रेल्वे कर्मचारी, गँगमन आणि स्टेशन मास्तर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.