मुंबई : २६/११ हल्ल्यातला मुख्य गु्न्हेगार डेव्हिड हेडली याची आजची सुनावणी तहकूब झाली. ही सूनावणी उद्या सकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेडली अमेरिकन तुरुंगात शिक्षा भोगतोय. मुंबईमध्ये सुरू असलेल्या खटल्यात त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी सुरू आहे. मात्र आज तांत्रिक अडचणीमुळे ही कॉन्फरन्स होऊ शकली नाही. सकाळी ७ वाजता सुनावणी सुरू होणं अपेक्षित होतं. त्यानंतर ही वेळ पुढे ढकलण्यात आली. अखेर सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 


उद्यासाठी दीड तासाचा अधिक वेळ अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलाय. यामध्ये हल्ल्याबाबत आणखी तपशील मिळवण्याचा सरकारी बाजूचा प्रयत्न असेल. हेडलीनं गेल्या दोन दिवसांत दिलेल्या साक्षीत हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचं वारंवार सांगितलंय. पाकिस्तान लष्करापासून ते ISIच्या अनेक अधिकाऱ्यांना भेटल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. हेडली आणखी काय गौप्यस्फोट करतो याकडे लक्ष लागलंय.