पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँकांना सुट्टी
पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या.
मुंबई : पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या.
याचेही कारण तसेच आहे. पुढच्या आठवड्यात बँकांना चार दिवस सुट्टी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मतदानासाठी २१ फेब्रुवारी मंगळवारी सुट्टी देण्यात आलीये.
त्यानंतर बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस बँका सुरु राहतील. त्यानंतर शुक्रवार महाशिवरात्री असल्याने बँक बंद त्यासोबतच चौथा शनिवार आल्याने ती सुट्टी आणि रविवार. अशी सलग तीन दिवस बँकेला सुट्टी असणार आहे.
त्यामुळे पुढल्या आठवड्यात तुम्ही बँकेची काही महत्त्वाची कामे करणार असला तर तुम्हाला या तीन दिवसांतच आटपावी लागतील.