मुंबई : देशातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकत, ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. यामुळे काळा पैसा ठेवणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या लोकांकडे काळा पैसा नाही, त्यांनी याची कुठलीही चिंता करण्याची गरज राहिलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) जर तुमच्याकडे काळापैसा नसेल, तर चिंता नाही. कारण ३० डिसेंबर २०१६ पर्यंत तुम्ही कधीही बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे जमा करू शकतात. या नोटा तुम्ही बँकेत जमा करून नव्या नोटा घेऊ शकतात.


२) या बाबतीत सरकारकडून काही अतिमहत्वाच्या ठिकाणी काही दिवस सूट देण्यात आली आहे. मेडिकलसाठी तुम्ही जुन्या नोटा वापरू शकतात. ८ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर  मध्य रात्रीपर्यंत हॉस्पिटलमध्ये जुन्या नोटा चालू शकतील.


३) या ७२ तासात पेट्रोल पंप, सीएनजी स्टेशन सारख्या ठिकाणी जुन्या नोटा चालू शकतील. 


४) तुम्ही डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंट केले तर चालेल, त्याला कोणतीही सीमा नाही.


५) १० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तुम्ही, ४ हजार रूपये बदलून घेऊ शकतात. २५ नोव्हेंबर नंतर ही मर्यादा वाढवली जाऊ शकते, मात्र तुम्हाला ओळखपत्रासह बँकेत जावं लागणार आहे.


६) सुरूवातीला बँकेतून प्रत्येक दिवशी १० हजार रूपये काढता येणार आहे, तसेच एका आठवड्याला २० हजार रूपये. याला पर्याय म्हणून खरेदीसाठी क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करा.


७) जर तुम्ही ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करू शकले नाहीत, तर चिंता करण्याची गरज नाही. कारण रिझर्व्ह बँकेच्या शाखांमध्ये घोषणा पत्र आणि आयडी कार्डसोबत तुम्ही ३१ मार्च २०१७ पर्यंत जुन्या नोटा देऊ शकतात.


८) बँकेत पैसा जमा करा, किंवा जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा घ्या. यावेळी कोणता माणूस किती पैसे जमा करतोय यावर नजर असणार आहे.


९) अर्थातच इनकम टॅक्सच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसा जमा करणाऱ्यांवर नजर असणार आहे.


१०) बँकेच्या कॅमेऱ्यांचीही नजर असणार आहे. रिझर्व्ह बँकेने लोकांना सावधानता ठेऊन पैसे जमा करण्याचं आवाहन केलं आहे.