मुंबई : जगात शुक्रवारी ९९ देशांमध्ये सायबर हल्ला झाला. यात भारताचाही समावेश होता. यात आंध्र पोलिसांचे १०२ कम्प्युटर्स सायबर हल्लेखोरांनी हॅक केले, यात एटीएम मशीन्सचा समावेश होता.ही बाब सर्वात गंभीर होती, चिंतेची होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील ७० टक्के एटीएम्सचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात न आल्याने, सायबर हल्लेखोरांचं फावलं आहे. यामुळे एटीएम यापुढे कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात.


केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक, इतर बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या महत्त्वाच्या इतर वित्तीय संस्थांना अॅलर्ट जारी केला आहे.


२०१४ पासून मायक्रोसॉफ्टने विंडोज XP साठी सुरक्षा आणि इतर सुविधा पुरवण्याचे बंद केले आहे. यामुळे हे एटीएम सहज सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकतात अशी परिस्थिती आहे.


देशातील ७० टक्के एटीएममध्ये अजूनही आउटडेटेड विंडोज XP या सॉफ्टवेअरचा वापर होतोय. बँकांना जे ही यंत्रणा पुरवतात त्यांच्या हातीच त्याचे नियंत्रण असते. तसेच मायक्रोसॉफ्टने विंडोज XP चा सपोर्ट काढून घेतला आहे. 


जगभरात शुक्रवारी झालेल्या सायबर हल्ल्यात आउटडेटेड सॉफ्टवेअर असलेले कम्प्युटर्सच सर्वाधिक हॅक झाले होते.


आंध्र प्रदेशात पोलिसांच्या अनेक सिस्टिम्स शुक्रवारी सायबर हल्ल्यात हॅक झाल्या होत्या. पण यात दिलासादाय बाब म्हणजे पोलिसांचा सर्व डेटा सुरक्षित राहिला. केंद्रीय गृहमंत्रालय आणि इतर राज्यांच्या मदतीने आंध्र पोलिसांना आपला डेटा सुरक्षित ठेवला आहे.