मुंबई : बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांना कित्येक तास रांगेत उभं रहावं लागतं. मात्र, आता गणेशभक्तांना गणपतीचं दर्शनं घेणं सोप झालं आहे.


MTDC अर्थातच महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉपर्शेननं गणेश दर्शनाची खास सोय केली आहे. एका बसमधून मुंबईतील 6 मोठ्या गणपतींचं दर्शन अगदी सहज मिळणार आहे. यात अंधेरीचा राजा, माटुंग्याचा जीएसबी, सिद्धीविनायक, लालाबागचा राजा, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आणि गिरगावचा केशवजी नाईक चाळचा गणपती. पण  यासाठी गणेशभक्तांना 2001 रुपये मोजावे लागणार आहेत.