मुंबई : अभिनेता आमिर खान सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतो. मतदान करा, तो तुमचा अधिकार आहे, अशी जाहिरातही अभिनेता आमिर खानची तुम्ही पाहिली असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पेजवर २२ फेब्रुवारी रोजी आमिर खानची मतदान करा अशी जाहिरात आहे, मात्र आमिर खानने मतदानाला दांडी मारली आहे.


आमिर खान मतदानाला आला नाही, तर नेमका कुठे गेला आहे हा प्रश्न उपस्थित झाल्यावर आमिर खान ठग्स ऑफ हिंदुस्थान चित्रपटाचं शुटिंग करतोय, असं म्हटलं जात आहे. यावरून तुम्हाला काय समजायचं असेल ते समजा, पण तुम्हाला नक्कीच ठकवल्यासारखंही वाटू शकतं.