डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान असल्याचं अभिनेता आमीर खानने म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान असल्याचं अभिनेता आमीर खानने म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला.
बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले, असं आमीरने म्हटलं आहे.
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या 'बाबासाहेबांच्या विचारांचा महोत्सव' या कार्यक्रमात आमीर खान बोलत होता.
परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत, असंही आमीरने म्हटलं आहे.