मुंबई : मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. मात्र, या अपघतानंतर पुन्हा एकदा पोलिसांची असंवेदनशीलता समोर आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका बाईकला झालेल्या या अपघातानंतर दोन तरुण रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडले होते. मात्र, यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी दाखवलेली असंवेदनशिलता... 


हद्दीतले नाही म्हणून... 


केवळ आपण या हद्दीतले नाही, म्हणून या युवकांना मदत करण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. सुमारे अर्धा तास हे दोन्ही युवक मदतीच्या प्रतिक्षेत तळमळत पडले होते. 


साहिला चड्ढानं दाखवली माणुसकी


पोलीस असे हद्दीच्या वादात अडकले असताना तिथून जात असलेली 'हम आप के हैं कौन'फेम अभिनेत्री साहिला चड्ढा हिनं पत्रकार आणि उपस्थितांच्या मदतीनं त्या दोन युवकांना रुग्णालयात पोहोचवलं.


झी मीडियाच्या प्रतिनिधीनं पोलिसांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न करताच त्यांनी चक्क काढता पाय घेतला. हायकोर्टानं सांगो... नाहीतर सुप्रीम कोर्टानं... पोलिसांच्या हद्दीचा वाद काही शमणार नाही... 


पण, या सगळ्यामध्ये साहिलाचं कौतूक व्हायला हवं... तिचा मानलेला भाऊ, राहुल राज प्रत्युषा प्रकरणात अडकला असताना तिनं अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिलाय.