MRP पेक्षा अधिक घेणाऱ्यांची तक्रार इथं करा
राज्य सरकारच्या वैध मापन विभागानं मॉल-मल्टिप्लेक्समध्ये पाणी, सॉफ्ट ड्रींक इत्यादीची वाजवीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्यांना चाप लावलाय.
मुंबई : राज्य सरकारच्या वैध मापन विभागानं मॉल-मल्टिप्लेक्समध्ये पाणी, सॉफ्ट ड्रींक इत्यादीची वाजवीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्यांना चाप लावलाय.
MRPपेक्षा अधिक दरानं वस्तूंची विक्री करणारे मल्टिप्लेक्स आणि रेस्ट्राँवर कारवाई करण्यात आली असून दोन MRP छापणाऱ्या कोकाकोला, पेप्सीसह अनेक कंपन्यांना नोटीस बजावण्यात आलीये. त्यांना 7 दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत.
आयनॉक्स, इरॉस, पीव्हीआर या मल्टिप्लेक्सना नोटीस पाठवण्यात आलीये. मुंबई, पुणे, नागपूर, रायगडमधल्या एकूण 134 रिटेलर्स आणि कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.
कोणत्या मल्टीप्लेक्सवर झाली कारवाई
- आयनॉक्स, नरिमन पॉइंट
- इरॉस थिएटर, मुंबई
-पीव्हीआर, फिनिक्स मॉल, परेल
-जयहिंद सिनेमा, चिंचपोकळी, मुंबई
-आयनॉक्स टॉकिज, घाटकोपर
-पीव्हीआर, पनवेल
-अॅडलॅब्स, खालापूर
-आयनॉक्स बंडगार्डन पुणे
-आयनॉक्स, हडपसर
फूडचेन्स, रेस्टॉरंट्स, मॉल्सवर झाली कारवाई
-ऑरेंज हॉटेल, कांदिवली
-शिवसागर रेस्टारंट, एअरपोर्ट, मुंबई
-बाकेर्स स्ट्रीट, अंधेरी
-मियायम एजन्सी एअरपोर्ट
-द ग्रेट कबाब फॅक्टरी, अंधेरी
-कार्नव्हल कंपनी, एलबीएस मार्ग, मुंबई
-नील स्क्वेअर मॉल, घाटकोपर
- सफायर फूड, नागपूर
किती संस्थामध्ये काय चुकीचे झाले
- एकूण ३४५ संस्थांमध्ये चेकिंगची कारवाई
- १३४ विरोधात कारवाई
- २४ संस्थांवर दुहेरी MRP केस दाखल
- ६५ विरोधात MRPपेक्षा अधिक वसुलीची केस
-४५ विरोधात इतर तक्रारीविरोधात कारवाई
दुहेरी MRP विरोधात दिग्गज कंपन्यांना नोटीस
- हिंदुस्तान कोका कोला प्रा. लि.
-पेस्सीको इंडिया होल्डिंग प्रा. लि.
- रेड बुल इंडिया प्रा. लि.
-युरेका फोर्ब्स लि.
वस्तू एक किंमती दोन
- कोका कोलाने kinley पाण्याच्या बाटलीवर २० रुपये आणि ५० रुपये अशी किंमत ठेवली ( १ लीटर पाण्यासाठी)
- पेप्सीकोने अॅक्वाफिना पाण्याच्या बाटलीवर २० रुपये आणि ४० रुपये अशी किंमत ठेवली ( १ लीटर पाण्यासाठी)
- रेडबुलने ११० रुपये आणि १४५ रुपये अशी किंमत ठेवली ( २५० एमएल कॅन)
- युरेका फोर्ब्सने अॅक्वा सुअर पाण्याच्या बाटलीवर १० रुपये आणि २० रुपये अशी किंमत ठेवली ( ५०० मिली पाण्यासाठी)
ग्राहकांनी करा येथे तक्रार -
आता भविष्यात तुमच्याकडून अशा प्रकारे अतिरिक्त पैसे उकळण्याचा प्रयत्न होत असेल तर तुम्ही खाली क्रमांकावर तक्रार करावी
महाराष्ट्रात तक्रारीसाठी - ०२२-२२८८६६६६
मेल आयडी - dclmms_complaints@yahoo.com
देशभरातील तक्रारीसाठी
National Consumers Helpline - Toll free no. 1800-11-4000
तसेच toll no - 011-23708391,
किंवा
SMS करा 8130009809 वर
तसेच वेबसाईट - http://consumerhelpline.gov.in