विनयभंगाची तक्रार दाखल न करून घेणे महागात
तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई करणे वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना महागात पडले आहे. कालिनात एका तरुणीला मारहाण आणि विनयभंगप्रकरणी तक्रारीस दिरंगाईचा आरोप संजय पवार यांच्यावर आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या पवार यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्यात आली आहे.
मुंबई : तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई करणे वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना महागात पडले आहे. कालिनात एका तरुणीला मारहाण आणि विनयभंगप्रकरणी तक्रारीस दिरंगाईचा आरोप संजय पवार यांच्यावर आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या पवार यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्यात आली आहे.
पवार यांनी तरुणीची भाषा समजत नसल्याने तिचा विनयभंगदेखील झाला, ही बाब मला समजली नाही, असा जबाब दिला होता. दरम्यान, मी पवार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे समाधानी आहे. मात्र माझ्यावर हल्ला करणाऱ्या इसमाला कडक शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे असे या तरूणीने म्हटले आहे.
कालिना परिसरात राहणाऱ्या एका मेकअप आर्टिस्ट तरुणीला २७ फेबु्रवारी रोजी रवी जाधव नावाच्या तरुणाने मारहाण करत तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत ती पोलिसांकडे तक्रार देण्यास गेली असता तत्कालीन ड्युटी अधिकारी पवार यांनी निव्वळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून तिला परत पाठविले होते.
हे प्रकरण वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर या प्रकरणी मारहाण आणि विनयभंगाची एफआयआर दाखल करून घेण्यात आली आणि जाधवला अटक करण्यात आली. सहायक निरीक्षक यांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते.