मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रेल्वेने महिला प्रवाशांना सुरक्षा कवच प्रदान केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेनं महिला प्रवाशांसाठी डब्यात 'अॅडव्हान्स टॉकबॅक' सिस्टीम लावली आहे. त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास महिलांना मोटरमन आणि गार्डच्या केबिनमध्ये संपर्क करता येणार आहे. 


8 मार्च म्हणजे आज 'महिला दिनी' ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. सुरूवातीला पश्चिम रेल्वेवरील 2 गाड्यांच्या महिला डब्यात ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.


कोणी टॉकबॅकचा गैरवापर केला तर त्या प्रवाशाचा चेहरा सीसीटीव्हीत कैद होईल.