मुंबई : एअरटेलचा धमाकेदार प्लान आला आहे, या प्लानमध्ये तब्बल २८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलनं जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लान आणला असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती एअरटेलच्या या प्लाननुसार,  एअरटेलच्या या प्लानची किंमत ३४५ रुपये असणार आहे. यूजर्सला दररोज १ जीबी ४जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. यात दिवसा यूजर्सना ५०० एमबी डेटा आणि रात्री ५०० एमबी डेटा वापरता येणार आहे. या डेटाची व्हॅलिडीटी २८ दिवस असेल.


 ही ऑफर ३१ मार्चपर्यंत ४जी यूजर्स घेऊ शकतात. ३१ मार्चच्या आधी ही ऑफर घेणाऱ्या यूजर्संना ३४५ रुपये किंमतीत पुढील ११ महिने हा प्लान घेता येईल. 


तर आयडीयानंही ३४५ रुपयात १४जीबी ४जी डेटा आणि अनलिमिटेड टेरिफ प्लानची घोषणा केली आहे. वोडाफोनने देखील ३४६ रुपयात २८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग असा नवा प्लान लाँच केला आहे. मागील महिन्यात जिओनं ३०३ रुपयात यूजर्सला २८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग याची घोषणा केली आहे.