हा तर वसंतराव नाईकांचा अवमान - अजित पवार
विधानसभेत जीएसटी विधेयक मंजुरीसाठी कामकाजाला सुरुवात होताच विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : विधानसभेत जीएसटी विधेयक मंजुरीसाठी कामकाजाला सुरुवात होताच विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. १ जुलै हा मतदार दिवस म्हणून जाहीर केल्याचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.
१ जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून तो कृषी दिन म्हणून साजरा होता. अशा वेळी मतदार दिवस जाहीर करुन सरकारनं वसंतराव नाईक यांचा अवमान केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
मात्र वसंतराव नाईक यांच्याबद्दल आदर असून कृषी दिन रद्द केला नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.