त्या नेत्यांविरोधात अण्णांची पोलिसांकडे तक्रार
राज्यातील सहकारी साखर कारखाना खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे.
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखाना खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. राज्यातील 100 सहकारी साखर कारखान्यांमध्ये 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.
तक्रार अर्ज देतांना अण्णा यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप मधील बडे नेते यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. याची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि कारखान्यांची मूळ किंमत वसूल करावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.