मुंबई : तपासणीसाठी आलेल्या दहावी बोर्डाच्या 516 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गायब झाल्याचा प्रकार दहिसर पुर्वेतील घरटनपाडा येथील इस्रा शाळेत उघडकीस आला होता. त्यानंतर या शाळेनं उत्तरपत्रिका चोरी झाल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन विषयांच्या एकुण 516 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टागणीला लागले होते. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. या संशियातांची कसून चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलं. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. 


पोलिसांनी आरोपीकडून इतिहासाच्या 149 आणि संस्कृत विषयाच्या 181 उत्तरपत्रिक हस्तगत केल्यात. एकुण 330 उत्तरपत्रिका आता हस्तगत करण्यात आल्यात. उर्वरित 186 उत्तरपत्रिकांचा तपास सुरू आहे. या उत्तरपत्रिका चोरी प्रकरणात उत्तरपत्रिका रद्दीत विकून पैसे कमविण्याचा उद्देश असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितलं.