टीव्ही कलाकार अरमान ताहिलवर बलात्काराचा आरोप
टीव्ही कलाकार अरमान ताहिल याच्यावर मॉडेल अनुपम शुक्लाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोदवला आहे.
मुंबई : टीव्ही कलाकार अरमान ताहिल याच्यावर मॉडेल अनुपम शुक्लाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोदवला आहे.
अरमानने लग्नाची आमिष देत वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप अनुपम यांनी केला आहे.
पाच वर्षापूर्वी अनुपम आणि अरमान यांची एका कार्यक्रमा मध्ये ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीतून अरमान यांने मॉडेल अनुपम यांना लग्नाची अमिष दिली.
यानंतर दोघांच्या संमतीने १२ मार्च २०१६ पासून एकत्र राहत होते. अशी मॉडेल अनुपम यांनी सांगितलंय.सुत्राच्या माहितीनुसार अरमानने अटकपुर्व जामीनसाठी कोर्टात अर्ज केला आहे. सध्या अरमान फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.