मुंबई : लष्कराने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर  वादग्रस्त ठरलेली आदर्श सोसायटीची इमारत ताब्यात घेतली आहे.  कारगिल युद्धात शहीद झालेल्या कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श इमारतीतल्या सदनिका वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ही वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती देऊन ही इमारत संरक्षित करून लष्कराच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.


कारगिल युद्धात शहीद झालेल्या कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिका नेते, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या स्वकियांच्या नावे लाटण्यात आल्याची माहिती समोर आली होती.


या भ्रष्टाचारामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपले मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. या प्रकारामुळे ते चांगलेच चर्चेतही आले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लष्कराने आदर्श इमारतीचा ताबा घेतला आहे.