मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर जाऊन शेलार राज ठाकरेंना भेटले. जवळपास अर्धा तास आशिष शेलार हे राज ठाकरेंबरोबर होते. 


या दोघांमध्ये काय चर्चा झाली आणि भेट का घेतली याबाबत मात्र आशिष शेलार यांनी कोणतंही भाष्य केलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीआधी या दोघांची भेट झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.