मुंबई : दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. अशा वेळी पाणी माफिया, टँकर माफिया आणि पाणी चोरी करणा-या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आमच्या मित्र पक्षांनी राजाश्रय देऊ नये असं आवाहन करत, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला नाव न घेता डिवचलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचवेळी मुंबईच्या रस्त्यातील भ्रष्टाचार हा भाजपने खोडून काढला असं सांगत, यावेळी आशिष शेलार यांनी आयुक्तांचं अभिनंदन केलं. 


आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ३ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेवर ही अप्रत्यक्ष टीका केली.