मुंबई : महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं शिवसेनेपुढे नवा फॉर्म्युला मांडलाय. एका अटीसहीत काँग्रेसनं महापालिकेत पाठिंबा देण्याची तयारी दाखवलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राज्यातली युती' तुटल्यास मुंबई महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार करू, अशी भूमिका चिंतन बैठकीनंतर काँग्रेसचीनं मांडलीय. मनपा आणि जिल्हापरिषदेच्या निवडणूकीत पराभवनंतर आता आत्मचिंतनासाठी काँग्रेसची बैठक बोलावण्यात आली होती. मुंबईतल्या गांधी भवन इथे संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमाराला ही बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली होती. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना शिवसेनेला सशर्त पाठिंब्याची तयारी दर्शवलीय.  


मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्वाची बैठक उद्या संध्याकाळी 4.00 वाजता शिवसेना भवनात होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व नेते आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीत मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची रणनीती ठरणार आहे.