नव्या कोऱ्या `तेजस`वर दगडफेक, काचा फोडल्या
देशातील सर्वात वेगवान तेजस गाडीवर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याचं समोर आलंय. त्यामुळे या गाडीच्या काही डब्यांच्या काचा फुटल्यात.
मुंबई : देशातील सर्वात वेगवान तेजस गाडीवर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याचं समोर आलंय. त्यामुळे या गाडीच्या काही डब्यांच्या काचा फुटल्यात.
या प्रकरणी आता अधिक चौकशी सुरु आहे. ताशी २०० किलोमीटर वेगानं धावू शकणारी तेजस शुक्रवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाली.
२२ तारखेपासून ही गाडी सीएसटी ते करमाळी दरम्यान धावणार आहे. रेल्वेनं कालचं या गाडीचं वेळपत्रक जाहीर केल होतं. अजून या गाडीचा पहिला प्रवास झाला नाही... आणि दगडफेकीची घटना घडल्यानं खळबळ उडालीय.
पावसाळ्यात चार महिन्यात तीन दिवस ही गाडी धावणार आहे. तर इतर महिन्यांत पाचदिवस मुंबई-गोवा प्रवास प्रवाशांना करता येईल.