भाजप-शिवसेना युतीतला वाद दूर करण्याचे प्रयत्न, मुनगंटीवार मातोश्रीवर
भाजप-शिवसेना युतीतला वाद दूर करण्यासाठी आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : भाजप-शिवसेना युतीतला वाद दूर करण्यासाठी आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.
मुनगंटीवार यांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राज्यात १ जुलैला होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार स्वत: मातोश्रीवर गेले असले तरी यानिमित्ताने भाजप-शिवसेनेतले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न असेल, अशी सूत्रांची माहिती आहे.
ही सदिच्छा भेट असली तरी या भेटीत राजकीय चर्चा अपेक्षित आहे. मुनगंटीवार यांनी मातोश्रीवर जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना वाघाची प्रतिकृती भेट म्हणून पाठवली. आता मुनगंटीवारांचा वाघ दोन्ही पक्षातला वाद मिटवणार का याकडे लक्ष लागले आहे.