मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं आहे.


स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी ही सुधारणा सुचवली होती. विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. आता सुधारणा करण्यात आलेले विधेयक सभेत सुधारणा सहित मंजूर करुन घ्यावे लागेल.