मुंबई : आगामी काळात छोट्या शहरात राहणाऱ्यांना आरोग्य विम्यामध्ये मोठा फटका बसू शकतो. छोट्या शहरात विमा उतरवला असेल तर रक्कमेची भरपाई करताना त्याच शहरात उपचार केलेले असणं बंधनकारक होऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विम्याची रक्कम ही त्या शहरामध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवेनुसार निश्चित होते. मात्र अनेकदा अशा ठिकाणी विमा काढल्यानंतरही मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळ विमा कंपन्यांचं नुकसान होत असल्याचं समोर आले आहे. 


त्यामुळेच आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्याचा कंपन्यांचा मानस आहे. मात्र छोट्या शहरांमध्ये उपचार होऊ न शकणाऱ्या आजारांबाबत भूमिका काय असेल, हेदेखील कंपन्यांना निश्चित करावं लागेल.