मुंबई : तोट्यात चालणा-या 266 एसी बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता बंद केलेल्या एसी बसचं पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. या एसी बस भंगारात द्याव्यात असा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे. 


या एसी बस साध्या बसमध्ये रुपांतरित करुन वापरण्याजोग्या करण्यासही मोठा खर्च येणार आहे. तसंच या बस आणखी केवळ ४ वर्षेच चालू शकणार असल्यानं त्यांची पूनर्रखरेदी करणंही शक्य नाही. 


महिन्याला तब्बल 11 कोटींचा तोटा होत असल्यानं या बस बंद केल्या आहेत.  त्यामुळे बेस्ट प्रशासनापुढे या एसी बस भंगारात देणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. 


मात्र, फायबर बाँडी असलेल्या या बसची भंगारातही फारशी किंमत येणं शक्य नाही. त्यामुळे वर्षाला कोट्यवधींच्या या २६६ एसी बसेसना भंगारातूनही फारशी किंमत वसूल करता येणं शक्य नसल्याचं समोर येतंय.