मुंबई : कॅबिनेटच्या बैठकीत पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायाला मिळाले. नुकत्याच झालेल्या पेट्रोलच्या दरवाढीबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. त्यातही मुंबई आणि राज्याच्या इतर भागातल्या दरांमध्ये तफावत आहे. ही तफावत दूर होऊन राज्यात एकसमान दर असावा, अशी शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी होती. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी स्वतःच्या अधिकारात निर्णय घ्यावा, अशी मागणीही शिसेना मंत्र्यांनी केली. मंत्रीमंडळमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे नाराजी नाट्य दिसून आली. राज्य सरकारच्या निर्णयावर मंत्र्यांनी जाब विचारला. तीन रुपये दरवाढ झाल्याने ही नाराजी व्यक्त केली.