भाजप उमेदवाराने शिवसेना उपशाखाप्रमुखाला केली मारहाण?
मुंबई महापालिकाची रणधुमाळी आता खूपच वाढली असून हमरीतुमरी आणि हाणामारी पर्यंतचे प्रकार दिसत आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकाची रणधुमाळी आता खूपच वाढली असून हमरीतुमरी आणि हाणामारी पर्यंतचे प्रकार दिसत आहेत.
मुंबईतील प्रभाग क्रमांक ११ चे भाजप उमेदवार प्रकाश दरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप लावण्यात आला आहे. शिवसेना उपशाखाप्रमुख सुरेश महाडिक ( वय ६२ वर्षे) यांना त्यांनी मारहाण केली असा आरोप लावण्यात आला आहे.
दहिसर पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात तक्रार नोंदवत असताना सुरेश महाडिक तिथंच कोसळले. महाडिक यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले जात आहे.