`सामना`वर बंदी घालावी - भाजपची मागणी
भाजप-शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय.
मुंबई : भाजप-शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय.
शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केलीय. यासंदर्भात भाजपनं निवडणूक आयोगाला पत्रही पाठवलंय.
'सामना'मधील वृत्तांमुळं आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा भाजपनं केलाय.
16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापण्यावर बंदी घालण्याची मागणी भाजपनं केलीय. आता यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलंय.