राज्यात पाहा कोणाची कामगिरी सरस, कोण बॅकफूटवर?
भाजप महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांमध्ये नंबर एकचा पक्ष झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला झाले आहे.
मुंबई : भाजप महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांमध्ये नंबर एकचा पक्ष झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला झाले आहे.
मुंबई महापालिका (227)
भाजप-82 (31), शिवसेना-84 (75), काँग्रेसचं-31
(52), राष्ट्रवादी-9 (13), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे-7 (28), इतर 14 (13)
भाजप 10 महानगरपालिकांपैकी 8 पालिकांत बहुमत मिळविले.
सर्व महापालिकांमध्ये राज्य एकूण आकडेवाडी
भाजप 629 (205), शिवसेना 268 (227), काँग्रेसचे-119 (264), राष्ट्रवादी काँग्रेसचे-139 (265), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 14 (112), इतर - 94 (171)
अशी आहे गंम्मत आहे?
एकिकडे भाजप आणि राज्यातील सर्व पक्षांची आकडेवारी विचारात घेता भाजपच अव्वल असल्याचे दिसत आहे. शिवसेना + राष्ट्रवादी + कॉग्रेसच्या + मनसे + बसपा + इंडस्ट्रीज + इतर = 634 आणि फक्त भाजप 629 आहे.
यावेळच्या महापालिका निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे. भाजपकडे तीन पालिका ताब्यात घेण्यात यश आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या पालिका ताब्यात घेण्यात घेतल्यात आहे. ही वाढ होऊन हा आकडा 8 वर पोहोचला.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद (एकूण जागा 1509) (घोषित : 1452)
भाजप - 400 (165), शिवसेना - 264 (233), काँग्रेस - 293 (419), राष्ट्रवादी काँग्रेसचे - 346 (511), महाराष्ट्र नवनिर्माण सेना 0 (17), इतर -152 (170)
पंचायत समिती (एकूण जागा 2988) (घोषित: 2809)
भाजप - 803, शिवसेना - 538, काँग्रेस - 555, राष्ट्रवादी काँग्रेस - 630, मनसे - 2, इतर - 281