मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची वर्षावर महत्त्वाची बैठक सुरु झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बैठकीला प्रदेशाध्यक्ष दानवेंसह विनोद तावडे, आशिष शेलार, राज पुरोहित, पूनम महाजन हे भाजप नेते उपस्थित आहेत.


या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची युती करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. कटुता टाळून युती करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आधीच पक्ष नेत्यांना दिलेत... तर दुसरीकडे युतीचा लवकर निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आग्रही आहेत.