भाजपच्या मनोज तिवारींच्या गाडीची मुंबईत तोडफोड
दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांच्या गाडीची मुंबईत तोडफोड करण्यात आलीय.
मुंबई : दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांच्या गाडीची मुंबईत तोडफोड करण्यात आलीय.
खुद्द तिवारी यांनी आपल्या गाडीचे काही फोटो सोशल वेबसाईटवर जाहीर करत ही माहिती दिलीय.
काही अज्ञात व्यक्तींनी आपल्या गाडीचा उजव्या बाजुचा आरसा तोडल्याचं ट्विटमध्ये तिवारी यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा सल्लाही हल्लेखोरांनी दिल्याचा आरोप, तिवारी यांनी केलाय.
बीएमसी निवडणुकीतून बाजुला होण्याची धमकी देण्याची एक चिठ्ठी कारमध्ये फेकल्याचं त्यांनी म्हटलंय. या चिठ्ठीत प्रचार बंद न केल्यास थोबाड फोडण्याची धमकी दिल्याचंही म्हटलंय.
तिवारी यांच्यावर हा हल्ला कुणी केलाय हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.