मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईच्या विकासासाठी केंद्राकडून ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज आणण्यासाठी स्थापन केलेल्या खासदारांच्या फोरममुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे आमदार आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी एक ट्वीट करुन राहुल शेवाळे यांच्यावर टीका केली आहे. 'भाजपासरकार मुंबईकरांची काळजी घेईल. त्यामुळे उगाच फोरम स्थापन प्रसिद्धीच्या "शेवाळा"वरून कशाला घसरता? महापालिका बजेट किती % खर्च तो हिशोब आधी द्या?' असे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईचा विकास करण्यासाठी मुंबईचा निवासी पत्ता असणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांचा एक फोरम स्थापन केला आहे. ज्याद्वारे केंद्र सरकारकडे अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी ७० हजार कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे.