मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मातोश्रीवर पोहोचले आहेत. रावसाहेब दानवे युतीवर चर्चा करण्यासाठी नाही, तर रावसाहेब दानवे त्यांचा मुलगा संतोष दानवेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचं दिसून येत आहे. लग्नाची पत्रिका ही दोन पक्षांमधील संबंध पुन्हा जुळवण्यासाठी चांगलं कारण असल्याचं बोललं जातं आहे.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे देखील रावसाहेब दानवे लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना सरसंघचालकांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.