मुंबई : घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या फळवाल्याने मराठी माणसाला गाडी लावण्यास विरोध केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या इंजिनाला भाजप डिझेल पुरवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत फायदा होण्यासाठी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत.