मुंबईतल्या व्यूहरचनेसाठी भाजपची थोड्याच वेळात बैठक
भाजपला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुढची व्यूहरचना आखण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज रात्री १० वाजता होणार आहे.
मुंबई : भाजपला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुढची व्यूहरचना आखण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज रात्री १० वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी होणा-या या बैठकीत भाजपच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणाराय.
या बैठकीला कोअर कमिटीसह भाजपचे पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्षही सहभागी होणार आहेत. या बैठकीत तत्काळ निर्णय अपेक्षित नसले तरी पक्षाची रणनीती ठरवली जाणार आहे. सत्ताप्राप्तीसाठी शिवसेना किंवा अन्य पक्षांशी युती करण्याच्या पर्यायांवर यावेळी विचार होणार आहे.
दरम्यान शिवसेनेनंही उद्या संध्याकाळी ४ वाजता सेना भवनामध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व नेते आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक बैठकीला उपस्थीत रहाणार आहेत.