मुंबई : शहरातील कुलाबा ते सिप्झच्या दरम्यान होणाऱ्या मेट्रो ३ प्रकल्पाला १७ भूखंड देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेनं पुन्हा विरोध केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुद्द्यावर सभागृहात भाजप एकाकी पडला. पालिकेचे भूखंड मेट्रोला देण्यास शिवसेना, काँग्रेस, सपा आणि मनसेनं विरोध केला. या प्रकल्पामुळे गिरगावातील रहिवाशांची घरे जाणार असल्यामुळे शिवसेनेनं विरोध केलाय. 


यापूर्वीही १६ मार्चला हा प्रस्ताव सभागृहात फेटाळण्यात आला होता. आज हा प्रस्ताव पुन्हा संमतीसाठी आणला होता. मात्र, सेनेने विरोध केलाय.