मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी एकीकडे शिवसेना-भाजपची बोलणी सुरु असतानाच शाब्दिक युद्धही सुरू आहेत. भाजप युतीसाठी भीक मागणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्यांनी दिली आहे.


तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीविषयी फारसं काही फोडण्यास नकार दिला. युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.