मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांचं माहेरघर बनलेल्या डोंगरी भागातील तब्बल अकरा मजली अनधिकृत इमारत जमिनदोस्त करण्याची कामगिरी बीएमसीनं केली आहे. महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी अनधिकृत इमारत पाडली गेली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केशवजी नाईक मार्गावरील ही इमारत गेल्या आठ महिन्यांपासून तोडण्याचे काम बीएमसीच्या बी-विभागानं हाती घेतलं होतं. ही इमारत ग्राऊंड झिरोवर आणण्यासाठी बीएमसीला २६ लाख रूपयांचा खर्च आला. तो संबंधित बिल्डरकडून वसूल केला जातोय. 


मध्य आणि हार्बर रेल्वे लाईनला खेटून असलेली ही इमारत पाडण्यासाठी बीएमसीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अधिकाऱ्यांना अनेक धमक्याही आल्या. मात्र, न डगमगता ही इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली.