मुंबई : शॉपिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध वांद्र्यातील लिंकिंग रोडवरील मार्केट लवकरच उठणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ठिकाणी फेरीवाले आणि ग्राहकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलाय. 


लेटेस्ट ट्रेण्डचे फॅशनेबल कपडे, चप्पला आणि बॅगांसाठी लिंकिंग रोड मार्केट प्रसिद्ध आहे. फॅशनेबल कपड्यांची दुनिया म्हणून ओळखल्या जाणा-या लिंकिंग रोडवर एकूण 97 स्टॉलधारक आहेत. 


तसंच अनेक अनधिकृत फेरीवालेही आहेत. यापैकी परवानाधारक फेरीवाल्यांना जवळच्याच पटवर्धन पार्क ट्रॅफिक आयलँडवर स्थलांतरित करण्यात येणार आहे.