मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी जुळवून घेण्यासाठी भाजपचे पीच तयार
महापालिकेत सत्तास्थापनेसाठी मुंबईत शिवसेनेसोबत जुळवून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना नेत्यांशी गुप्त चर्चा, झाल्याचे वृत्त आहे. झी 24 तासला सूत्रांची ही माहिती मिळाली. त्यामुळे मुंबईतल्या सत्तास्थापनेसाठी वेग आला आहे.
मुंबई : महापालिकेत सत्तास्थापनेसाठी मुंबईत शिवसेनेसोबत जुळवून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना नेत्यांशी गुप्त चर्चा, झाल्याचे वृत्त आहे. झी 24 तासला सूत्रांची ही माहिती मिळाली. त्यामुळे मुंबईतल्या सत्तास्थापनेसाठी वेग आला आहे.
भाजप आणि शिवसेनेतली कटूता दूर होण्यासाठी पुढच्या 12 तासात भाजपकडून काही महत्त्वपूर्ण हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबत केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून मान्य करून घेतली आहे. शिवसेनेसोबत चर्चेसाठी भाजपनं हे पीच तयार केल्याचं बोललं जात आहे.
त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली भेटीत पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चाही केली. मुंबई महापौरपदाचा तिढा सोडण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. पंतप्रधानांचा संदेश घेऊन आलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुढच्या 12 तासात महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेतील हालचालींना वेग आलाय. कोकण भवनात गट स्थापनेच्या बैठकीला चार अपक्षांचीही हजेरी, चेम्बूरकर आणि सातमकरांमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच आहे.
तर दुसरीकडे शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही, राज्य सरकारला कुठलाही धोका नाही, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. प्रयत्न झाले तरी फडणवीस सरकार तरणार असल्याचं रोखठोक कार्यक्रमात वक्तव्य त्यांनी केले.