मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची आज सोडत जाहीर करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी १५ प्रभाग अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात सोडत जाहीर करण्यात आली.


नव्या 227 वॉर्डचे नकाशे पाहण्यासाठी खाली तीन लिंकवर क्लिक करा 


मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी १ ते १०२ वॉर्डचे Exclusive नकाशे (पश्चिम)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी १०३ ते १७१ वॉर्डचे Exclusive नकाशे (पूर्व)


 


मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी १७२ ते २२७ वॉर्डचे Exclusive नकाशे (शहर)


26, 53, 93, 121, 142, 146,152, 155, 169, 173, 195, 198, 200, 210 आणि 225 हे 15 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापैकी 53,121, 142, 200, 210 आणि 225 हे प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जमातींसाठी 59 आमि 99 हा वॉर्ड राखीव असेल. यापैकी 59 क्रमांकाचा वॉर्ड अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित आहे.


अनुसूचित जमाती महिला


ए (फोर्ट), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), डी (ग्रँट रोड) ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन वॉर्ड कमी होणार आहेत.


पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक वॉर्ड कमी झाला असून एल (कुर्ला) आणि एस (भांडुप) विभागात एक वॉर्ड वाढला आहे. याशिवाय एम पूर्व (मानखुर्द) विभागात दोन वॉर्ड वाढले आहेत.


पश्चिम उपनगरातील एच पूर्व (सांताक्रूझ) विभागातील एक वॉर्ड कमी झाला आहे. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील वॉर्डची संख्या एकने वाढली आहे. तसंच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन वॉर्ड वाढणार आहेत.